अनंदनाग जिल्ह्यात आंदोलकांच्या दगडफेकीत ट्रक चालकाचा मृत्यू


श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत ट्रक चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दगड करणार्‍या व्यक्तीला अटक केली असून या घटनेत नूर मोहम्मद डार (जरादीपुरा उरानहाल) या ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

निर्बंध कायम
दोन दिवसांपूर्वी श्रीनगर येथील संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षकाच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आवाहन करणारी भित्तीपत्रके फुटीरतावाद्यांनी काही ठिकाणी लावल्याने याठिकाणी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काश्मीरमधील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात संचारबंदीसह लागू केलेले काही निर्बंध मागे घेण्यात आले होते. जागोजागी लावलेले बॅरीकेटस् काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे रसत्यावर लोकांची वर्दळ व वाहनांची ये-जा सुरू झाली होती मात्र राज्यातील सर्व बाजारपेठा अद्यापही बंद आहेत.


कॉपी करू नका.