धुळे, जळगावसह तीन जिल्ह्यातून सात दुचाकींची चोरी : जामनेरची टोळी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


Seven Two-Wheelers Stolen Across Three Districts, Including Dhule and Jalgaon: Jamner Gang Nabbed by Bhusawal Market Police भुसावळ (22 एप्रिल 2026) : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह जामनेर तसेच नांदुरा पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी लांबवणार्‍या जामनेरच्या टोळीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून महागड्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळच्या तापी नगरातील आशिक विनायक झोपे (36) यांची होंडा शाईन मोटारसायकल (एम.एच.19 डी.जी.6722) ही 22 एप्रिल 2023 रोजी चोरी गेल्याने बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता शिवाय वाढत्या दुचाकी चोरीच्या अनुषंगाने पोलिसांनी गस्त वाढवून पाळत ठेवली होती. जामनेर तालुक्यातील चोरटे शहरात येवून दुचाकी चोरी करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी रवींद्र विठ्ठल भदाणे (29, मोहाडी, ता.जामनेर) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदार गजानन अशोक कोळी (27, कोळीवाडा नेरीदिगर, ता.जामनेर) सोबत दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस चौकशीत त्यांनी चार लाख 65 हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी काढून दिल्या. आरोपींनी या दुचाकी भुसावळ, जामनेर, जळगाव एमआयडीसी, नांदुरा, धुळे भागातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना न्यायालयाने 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, भुसावळ उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली बाजारपेठ डीबी पथकातील उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार कांतीलाल केदारे, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल चंद्रकांत रायपुरकर, कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल जीवन कापडे, कॉन्स्टेबल दिलीप कोल्हे, कॉन्स्टेबल योगेश माळी, भूषण चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल अमर अढाळे, कॉन्स्टेबल अक्षय कोतकर आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !