आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेत चोपड्याचा डंका : अनिलराज पाटील यांच्या चित्राने पटकावला तृतीय क्रमांक
Chopda Makes a Mark in International Art Competition : Anilraj Patil’s Painting Secures Third Place चोपडा (26 एप्रिल 2026) : उत्तराखंड येथील नैनीताल शहरातील आंतरराष्ट्रीय पातळीवर मिट्टीसे रंग तक सांस्कृतिक संस्था यांच्या अंतर्गत 23 एप्रिल 2026 जागतिक पृथ्वी दिवस निमित्त मोफत स्वरूपात अंतरराष्ट्रीय पातळीवर दोन गटात चित्रकला प्रतियोगिता व प्रदर्शन घेण्यात आली. यात देश भरातून कलावंत व कला विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या चित्रकला स्पर्धेत कलावंतांनी आपल्या चित्राद्वारे पृथ्वीचे होणारे, जल प्रदूषण, वृक्ष तोड अशी चित्र संकल्पना चित्रातून मांडली. चोपडा येथील गणेश मूर्तिकार अनिलराज पाटील यांच्या चित्राला या स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त झाला.
175 कलावंतांचा सहभाग
‘मिट्टी से रंग तक’ या स्पर्धेत एकूण 175 कलावंत सहभागी झाले. मोठे गट यात तृतीय क्रमांक पुरस्कार देण्यात आला. या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.पूनम यांनी पुरस्कार प्रमाणपत्र, कास्य पदक व रंगसाहित्य देवून गौरवण्यात आले. या चित्रात अनिलराज यांनी एक कापलेलेल्या वृक्षात कुर्हाड दाखवली व कुर्हाडीच्या लाकडी दांड्याला नवीन कोवळी पाने येतात व एक चिमणी तिच्या घरट्याकडे येत असल्याचे दर्शवले.

या यशाबद्दल चोपडा येथील चित्रकला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी कौतुक केले. अनिलराज हे पूर्ण महाराष्ट्र राज्यातून व जळगाव जिल्ह्यातील एकमेव कलावंत या स्पर्धेत सहभागी झाले.
अनिलराज यांनी साधे रंगीत बॉल पेनच्या सहाय्याने कागदावर चित्र रंगविले आहे शिवाय ‘पेड पंछी बिना होगा, यह संसार सुना सुना’ असे स्लोगनही दिले आहे.
