डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश


Success of Brain and Spine Specialists at Dr. Ulhas Patil Hospital जळगाव (10 मे 2026) : वेळेवर निदान आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे अपघातग्रस्त शेतकर्‍योच प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली.

शेतकर्‍यावर शर्थीचे उपचार
यावल तालुक्यातील शंकर महाजन (वय 55), हे जळगाव तालुक्यातील शेतकरी शेतातून घरी परतत असताना बैलगाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसून ते बेशुद्ध अवस्थेत गेले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ.विपूल राठोड यांनी त्यांची तात्काळ प्राथमिक तपासणी केली. डॉक्टरांनी तातडीने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. सीटी स्कॅन अहवालात मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीला वैद्यकीय भाषेत एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा असे म्हणतात, जी जीवघेणी ठरू शकते.रक्ताची गाठ मेंदूवर दाब निर्माण करत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.



डॉ.विपूल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मयूर बर्हाटे, डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. प्रितम दास, डॉ. शार्दुल, डॉ. कोमेश नेमाडे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे, डॉ. मारीया यांच्या टीमने ‘क्रेनीओटोमी’ ही जटिल शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. ही शस्त्रक्रिया दीड ते दोन तास चालली. शस्त्रक्रियेच्या दरम्यान डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने मेंदूमधील रक्ताची गाठ काढून टाकली आणि रक्तस्त्राव थांबवण्यात यश मिळवले. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर काही काळ रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून त्यांची प्रकृती बारकाईने निरीक्षणाखाली ठेवण्यात आली. हळूहळू रुग्णाची प्रकृती सुधारू लागली. काही दिवसांच्या उपचारानंतर शंकर महाजन यांना शुद्ध आली आणि त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.

गोल्डन अवर्समध्ये उपचाराने वाचले प्राण
अपघातानंतर एका तासाच्या आत म्हणजेच गोल्डन अवर्समध्ये हा रूग्ण आल्यानंतर तातडीने सीटी स्कॅन करून निदान केले असता एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा ही गंभीर अवस्था आढळून आली असली तरी वेळेवर शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य होते. या प्रकरणात रुग्णाला वेळेत उपचार मिळाल्यामुळेच त्यांचे जीवन वाचवता आले.योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य यामुळे शंकर महाजन यांना नवजीवन मिळाल्याचे डॉ.श्रृती खंडागळे म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !