देश चालवणे पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर ; राहुल गांधींंचे मोदींच्या आवाहनानंतर टीकास्त्र
Running the Country Is Beyond the Prime Minister’s Capabilities; Rahul Gandhi Launches a Scathing Attack Following Modi’s Appeal. नवी दिल्ली (11 मे 2026) : आता देश चालवणे पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर गेले असून काल मोदीजींनी जनतेकडून त्याग मागितला. सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खत आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे उपदेश नाहीत तर अपयश असल्याचे राहुल गांंधी म्हणाले. सोमवारी पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील ‘सात आवाहनांव
र’ राहुल यांनी यावेळी पलटवार करीत हे तर पंतप्रधानांचे अपयश म्हटले.
काय म्हणाले, राहुल गांधी ?
राहुल म्हणाले, 12 वर्षांत देशाला अशा टप्प्यावर आणले आहे की जनतेला सांगावे लागत आहे. काय खरेदी करावे, काय नाही. कुठे जावे, कुठे नाही.


नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन
खरेतर, रविवारी सिकंदराबाद येथील एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या गरजेवर भर दिला होता, जेणेकरून परकीय चलनाची बचत होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.
पंतप्रधान मोदींनी रविवारी सांगितले होते की, ‘आजच्या काळात पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा लागेल. शेजारील युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम झाला आहे, कारण आपल्याकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत. पेट्रोल, गॅस आणि डिझेल वाचवण्यासाठी आपल्याला वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज आहे.
अनावश्यक वाहन वापर कमी करा. मेट्रोने प्रवास करा आणि कारपूलिंग करा. जास्तीत-जास्त लोकांना त्यात बसवून घेऊन जा. प्रत्येक कुटुंबाने खाद्यतेलाचा वापर थोडा कमी केल्यास परकीय चलनाची बचत होईल आणि लोकांचे आरोग्यही सुधारेल. देशाने रासायनिक खतांचा वापर अर्धा करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे आणि नैसर्गिक शेतीकडे वेगाने वाटचाल केली पाहिजे. लग्नसमारंभ, सुट्ट्या आणि इतर कारणांमुळे परदेश प्रवास काही काळासाठी पुढे ढकलणे देशहिताचे ठरेल. सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. देशहितासाठी लोकांनी एक वर्षापर्यंत सोने खरेदी करणे आणि दान करणे टाळावे.
भारतीय घरांमध्ये जगातील टॉप-10 बँकांपेक्षा जास्त सोने
भारतीय घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये 50 हजार टन सोने ठेवलेले आहे, ज्याचे मूल्य सुमारे 10 ट्रिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 830 लाख कोटी आहे. भारतीय व्यापारी संघटना एसोचॅम (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया) च्या अहवालानुसार, हे जगातील सर्वात मोठ्या 10 सेंट्रल बँकांच्या एकूण साठ्यापेक्षाही जास्त आहे.
