खासदार रक्षा खडसे भाजपाच्या शिष्टमंडळासह चीनच्या दौर्यावर
भुसावळ : चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या आमंत्रणावरून भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग व भाजप मुख्य कार्यालयप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली चीनच्या दौर्यावर आहे. या शिष्टमंडळात रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांचादेखील सहभाग आहे. भाजपचे शिष्टमंडळ चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेणार असून या भेटीदरम्यान भारत व चीन देशातील दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या संघटना, सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक व आर्थिक विषयावर विचारांचे आदानप्रदान होणार आहे.
यांचाही शिष्टमंडळात समावेश
या प्रतिनिधी मंडळात खासदार शिवकुमार उदासी, खासदार महेश पोद्दार, खासदार रक्षा खडसे, खासदार विवेक शेजवलकर, खासदार सुरेश पुजारी, भाजप परराष्ट्र विभाग प्रमुख डॉ.विजय चौथैवाले, राष्ट्रीय प्रवक्ता अॅड.नलिन कोहली, राष्ट्रीय प्रवक्ता गोपाळ कृष्ण अग्रवाल, झारखंड प्रदेशाध्यक्ष संजय टंडन, राष्ट्रीय मीडिया पॅनल सदस्या नितु डबास, प्रदिल्ली भाजप मीडिया प्रवक्ता अशोक गोयल यांचा समावेश आहे.