सोन्याला झळाळी : भाव पोहोचले 40 हजारांवर


मुंबई : दिवसागणिक सोन्याच्या भावात वाढ असून सोमवारी भाव तब्बल 40 हजार रुपये प्रति तोळ्यांवर पोहोचले. अमेरीका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. सोन्याच्या वाढलेल्या किंमतीने नवा इतिहास रचला आहे. अमेरीका व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत आहेत. शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा झाली, तरी सोने 600 रुपये प्रति तोळा तर चांदी एक हजार रुपये प्रति किलोने वाढली. विदेशात वाढलेली या धातूंची खरेदी व विदेशी वायदे बाजारातून निघणारे वाढीव भाव, यामुळे भारतातही भाव वाढत आहेत.


कॉपी करू नका.