धुळ्यातील जबरी चोरीची उकल : अट्टल आरोपी जाळ्यात

चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी : 55 हजारांचा मुद्देमाल जप्त


Dhule robbery case solved: Habitual offender nabbed धुळे (4 जुलै 2026) : कामानिमित्त धुळ्यात आलेल्या म्हसदीतील तरुणाला त्रिकूटाने पडक्या खोलीत नेत मारहाण करीत जबरी लूट केली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल होता. चाळीसगाव रोड पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली असून धुळ्यातील खुनातील संशयीत तथा अट्टल आरोपीला अटक केली आहे. अन्य एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?
30 जून 2026 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तक्रादार शोएब शब्बीर शहा (32, म्हसदी, ता.धुळे) यांना शंभर फुटी रोडवरील डीमार्ट जवळील बंद पडलेली शासकीय दुध डेअरीच्या खोलीत नेत मारहाण करण्यात आली तसेच मोबाईल, चार हजारांची रोकड व मोबाईलमधील ओटीपीचा गैरवापर करून 900 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेण्यात आले होते. याप्रकरणी गुरुवार, 2 जुलै 2026 रोजी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अट्टल आरोपीला अटक
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून इतर साथीदारांची माहिती समोर आली. त्यानुसार चिरंतन उर्फ दादू सतीश गवळी (ग.नं.7, पारोळा रोड, धुळे), हर्षल राजेंद्र मेढे (सहजीवन नगर, शासकीय दुध डेअरीजवळ, धुळे) व दत्तात्रय उर्फ दक्ष दिनेश पाटील (हॉटेल गणपती पॅलेसजवळ, मालेगाव रोड, धुळे) यांचा गुन्ह्यात सहभाग समोर आला तर हर्षल मेढेला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे हर्षलविरोधात मोहाडी पोलिसात आर्म अ‍ॅक्ट, जबरी लूट तसेच शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आरोपीकडून फिर्यादीचा दहा हजारांचा मोबाईल, 4900 रुपये व दुचाकी (एम.एच.18 सी.जी.9414) असा एकूण 54 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.निरीक्षक विवेक पवार यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस अंमलदार अजय जाधव, ललिचंद चौधरी, रमाकांत पवार, सचिन पाटील, इंद्रजीत वैराट, शोएब बेग, अतीक शेख, सिराज खाटीक आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !