भुसावळात वाढत्या जनआक्रोशानंतर पाणीपुरवठ्यात सुधारणा
Improvement in water supply after growing public outcry in Bhusawal भुसावळ (7 जुलै 2026) : भुसावळातील पाणीप्रश्न पेटल्यानंतर अशुद्ध होणार्या पाणीपुरवठ्याने पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची भीती होती. सातत्याने पालिकेवर निघत असलेले मोर्च व वाढलेला जनआक्रोश पाहता भाजप सत्ताधार्यांनी रविवारी सायंकाळी तातडीने तुरटीचा पुरवठा मागवून वापर सुरु केला. यामुळे रविवारी रात्री साडेआठ वाजेपासूनच पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली आहे. दरम्यान सोमवारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे व भाजप नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
मुदतवाढ संपल्याने तुरटीचा पुरवठा थाांला
पालिकेच्या तुरटी पुरवठादाराकडून मुदतवाढ नसल्याने तुरटीचा पुरवठा केला नाही. परिणामी पालिकेकडे अल्प साठ्याचा वापर करुनही जलशुद्धीकरण केले जात होते. यामुळे मात्र शहरातील पाणीपुरवठ्यात गाळाचे प्रमाण वाढले होते. या प्रकरणी शहरातून ओरड वाढल्यानंतर प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती महिमा नागराणी यांनी पाठपुरावा करुन लम मागवला. सायंकाळी लम पोहोचल्यानंतर चार तास सॅटेलींक टँकमध्ये पाण्यातील गाळ तळाशी बसल्यानंतर शहरात शुध्द पाण्याचा पुरवठा झाला.

पालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांनी केली पाहणी
पाणीपुरवठा विभागात सोमवारी नगराध्यक्षा नारखेडे व भाजप नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याची पाहणी करुन आढावा घेतला. तुरटीचा अतिरिक्त साठा मागवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. यासोबतच क्लोरिनेशन प्रक्रिया केली जात असल्याने पाण्यातील बॅक्टेरियावरही नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगामी काळात शहरात 100 टक्के शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी प्रभारी नगराध्यक्षा नारखेडे यांनी सांगितले.