25 हजारांच्या गुंगीकारक औषधांसह मालेगावातील ‘दाऊद’ जाळ्यात
धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोराणे गावाजवळ कारवाई
धुळे (गुरुवार, 16 जुलै 2026) : स्थानिक गुन्हे शाखेने गुंगी येणार्या औषधांचा तब्बल 25 हजारांचा साठा मालेगावातील संशयीताकडून जप्त केला आहे. ही कारवाई मोराणे, ता.धुळे येथे बुधवारी करण्यात आली.शकील सैय्यद दाऊद (36, नोमाणी नगर, मालेगाव, जि.नाशिक) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मोराणे गावाजवळ संशयीत गुंगीकारक औषधांचा साठा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. बुधवार, 15 रोजी पथकाने मोराणे गावाजवळील महामार्गावरून शकील सैय्यद दाऊद (36, नोमाणी नगर, मालेगाव, जि.नाशिक) यास ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून 24 हजार 730 रुपये किंमतीचा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करण्यात आला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे आणि विवेक वाघमोडे आदींच्या पथकाने केली.