यावलच्या श्री महर्षी व्यास मंदिरात पाडव्यानिमित्त छप्पन भोग अन्नकूट उत्साहात


यावल (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : यावल शहरातील हरिता व सरिता नदीच्या संगमावर वसलेल्या श्री महर्षी व्यास मंदिरात पाडव्याच्या निमित्ताने छप्पन भोग अन्नकूट नैवेद्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. यासोबतच मंदिरात दरवर्षीप्रमाणे अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणार्‍या काकड आरतीलाही प्रारंभ झाला. दररोज या काकड आरतीकरीता पहाटे भाविक-भक्तांची मंदिरात गर्दी होत आहे.

परंपरेनुसार महिनाभर आरती
शहरात श्री महर्षी व्यास मंदिरात दरवर्षी धार्मिक परंपरेनुसार महिनाभर काकड आरतीचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणार्‍या काकड आरतीलाही प्रारंभ झाला आहे व पहाटेच्या मंगलमय वातावरणात होणार्‍या या आरतीसाठी शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदाही पाडव्याच्या दिवशी मंदिरात छप्पन भोग अन्नकूट नैवेद्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी काकड आरती पार पडल्यानंतर श्री महर्षी व्यासांना विविध खाद्यपदार्थांचा समावेश असलेला छप्पन भोग नैवेद्य अर्पण करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. कार्यक्रमाला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत दर्शनाचा व धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला.

धार्मिक विधी झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महिनाभर चालणार्‍या काकड आरतीमुळे यावलकरांची पहाट भक्तिमय आणि मंगलमय होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !