यावल जे.टी.महाजन स्कूलमध्ये माजी मंत्री कै.जे.टी.महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


यावल (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे संस्थापक तथा माजी गृहमंत्री कै. जिवराम तुकाराम महाजन यांना 21 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन होत्या.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला इंग्लिश मेडियम स्कूलच्या प्राचार्या दीपाली धांडे, शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरूड यांची उपस्थिती होती. अध्यक्षांच्या हस्ते दादासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांच्या जीवनकार्यास उजाळा देण्यात आला या कार्यक्रमात शाळेच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !