अपघातात ठार झालेल्या वनरक्षकांच्या कुटुंबाला मदतीचा हात
रावेर वनविभागाने दिली 36 हजार 200 रुपयांची मदत.
रावेर- सहस्त्रलिंग येथे चारचाकीने दिलेल्या अपघातात वनरक्षक ममता पाटील यांच्यासह त्यांचे पती ठार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत चार वर्षीय चिमुकलीचे मातृ-पितृछत्र हरपल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सामाजिक बांधीलकी जपत रावेर वनक्षेत्र हद्दीतील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी जमून 36 हजार 200 रुपयांची वैयक्तिक मदत देत माणुसकी जोपासली. वनक्षेत्रपाल मुकेश महाजन, वनपाल अतुल तायडे, ए.एस.कोळी, एस.बी.भदाणे, आर.पी.तायडे, व्ही.एस.नारखेडे, वनरक्षक रोहिणी सोनार, अरुणा ठेपले, हरीष थोरात, कल्पना पाटील तर केर्हाळा येथील ग्रामस्थ अमोल पाटील, दीपक पाटील यांच्यासह अनेक वनरक्षक वनमजुरांनीही मदतीचा हात दिला.