शिवसेना-भाजपा युती होणारच – उद्धव ठाकरे

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजपा युती होणारच असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रसामाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना विधानसभा निवडणूक युती म्हणूनच लढवली जाईल असं सांगितलं. “आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजपा युती होणार असून युती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच नेत्यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना,“सत्तेला हापापलेले आमच्याकडे येतात असं नाही. ज्यांना पक्षासाठी काम करायची इच्छा आहे त्यांनाच आम्ही घेतो”, असं त्यांनी सांगितलं. तसंच अजून काही जण वेटिंगवर असून त्यांनाही शिवसेनेत प्रवेश दिला जाईल असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.




