भुसावळसह मुक्ताईनगर व वरणगावात सोनसाखळी लांबवणारे चोरटे जाळ्यात


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : अनेक गुन्ह्यांचा उलगडा

जळगाव : भुसावळसह मुक्ताईनगर व वरणगावात सोनसाखळी लांबवणारे अट्टल भुसावळातील तिघा चोरट्यांच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली आहे. अशोक सदाशीव कोळी (24, रा.इंदिरा नगर, भुसावळ), सोनु मोहन अवसरमल (21, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) व सागर सुभाष इंगळे (29, रा.राहुल नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे असून आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून आरोपींना मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तीन तालुक्यात धुमाकूळ
कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील महिलेचे 25 मे रोजी पहाटे पावणेपाच वाजता मॉनिर्ंग वॉकला जाताना चोरट्यांनी 24 हजारांचे मंगळसूत्र लांबवले होते तर वरणगावसह भुसावळातही अनेक महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याने समांतर तपास सुरू होता. तीनही तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अखेर यश आले.

यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, नरेंद्र वारुळे, अनिल इंगळे, सुनील दामोदरे, संतोष मायकल, रमेश चौधरी, दिनेश बडगुजर, मिलिंद सोनवणे, रवींद्र गिरासे, चंद्रकांत पाटील, दर्शन ढाकणे यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.