बोदवड स्टेट बँकेतून 77 हजारांची रोकड लंपास


बोदवड- शहरातील स्टेट बँक शाखेत पेट्रोल पंप मॅनेजर रोकडचा भरणा करण्यासाठी आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडी 77 हजारांची रोकड असलेली पिशवी लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बोदवड पोलिसा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर रोडवरील बजरंग सर्व्हिस सेंटर या पेट्रोल पंपावर मॅनेजर मनोज सज्जनसिंग राजपूत हे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रोकडचा भरणा करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी 77 हजार रुपये असलेली कापडी पिशवी बाकड्यावर ठेवली व स्लीप भरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे लक्ष चुकवून ती पिशवी लांबवली. बॅग नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरड केली मात्र चोरटे पसार झाले. बोदवड पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेत सीसीटीव्ही तपासल्यानंतर दोन मुले रक्कम घेवून पसार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


कॉपी करू नका.