बुडणार्‍या युवकाला जीवदान देणार्‍या अभियंत्याचा सत्कार


फैजपूर : आपल्या जीवाची पर्वा न करता सौरभ संजय वाणी या आर्किटेक्ट इंजिनीयरने धरणात बुडताना एक युवकाला जीवनदान दिल्याने महामंडलेश्वर जनार्दन हरीजी नहाराज यांनी शाल, पेन देवून सौरभ वाणी यांचा सतपंथी मंदिरात नुकताच सन्मान केला. मुंबईत शिक्षण घेणारा सौरभ हा कोरोनामुळे गावी परतला असून वड्री धरण पाहण्यासाठी गेला असता त्याने एका युवकाला बुडताना पाहताच त्याने 20 मीटर पोहत जावून युवकाचे प्राण वाचवले. आपल्या जीवाची पर्वा न करता सौरभने एका युवकाला जीवनदान दिले मात्र दुसर्‍या व्यक्तीला वाचवू न शकल्याने पदरी निराशा पडली, असे सौरभने यावेळी सांगितले. चौथीपासून पोहण्याची सवय असून वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हिंमत मिळते. वडिल संजय वाणी बांधकाम व्यावसायीक आहे. सौरभ सोबत त्यावेळी मित्र मयूर सराफ, ऋषिकेश सराफ, हिमांशू राणे, तुषार महाजन सोबत होते. सौरभवच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !