फैजपुरात मध्यप्रदेशातील निर्मित एक लाखाचा मद्यसाठा जप्त
फैजपूर : शहरातील एका बंद खोलीत मद्यसाठा असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागात मिळाल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी मिळालेल्या माहितीवर छापा टाकत तेथून एक लाख सात हजार 431 रुपये किमतीचा मद्याचा बनावट विदेशी साठा जप्त करण्यात यश मिळवले आहे. श्रीराम टॉकीज जवळ एका बंद खोलीत बेकायदा मद्यसाठा स्थित गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांना मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वाघ यांनी बुधवारी सकाळी ्यांच्या सहकार्यांसोबत मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी फैजपूर येथे पोहोचले त्यावेळेस त्यावेळेस खोलीची पाहणी केली असता खोलीत 87 हजार 360 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या तसेच दोन हजार 496 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा देशी दारूचे 48 बाटल्या तसेच एक हजार 50 रुपये किंमतीच्या सात विस्कीच्या बाटल्या पाच हजार 525 रुपये किमतीच्या मध्यप्रदेशातील निर्मिती आणि महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी प्रतिबंधित असलेल्या तेरा बाटल्या प्लॅस्टिक तयार मध्ये दहा लिटर तयार बनावट विदेशी दारू पाच हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा सुमारे एक लाख 7 हजार 431 रुपयांचा मुद्देमाल दारूबंदी विभागाच्या अधिकार्यांनी आणि कर्मचार्यांनी पंचनामा करून जप्त केला आहे. याप्रकरणी विकी प्रकाश अठवाणी (रा.फैजपूर) यास अधिकार्यांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे फैजपूर शहरात खळबळ उडाली आहे. अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई निरीक्षक वाघ भरारी पथकाचे निरीक्षक फुलझळके, निरीक्षक जाखेरे, निरीक्षक के.एन.बुवा, दुय्यम निरीक्षक के.बी.मुळे व कर्मचारी एस.एस.निकम, विपुल राजपूत, व्ही.डी. हटकर, वाय.आर.जोशी, भूषण वाणी, नंदू पवार आदींनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक व्हावे करीत आहे.

