रावेर गटविकास अधिकारीपदी दीपाली कोतवाल


रावेर : रावेर पंचायत समितीत गटविकास अधिकारी पदी 2009 च्या एम.पी.एसस्सी बॅचच्या दीपाली कोतवाल यांची नियुक्ती झाली असून त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. डॉ.सोनिया नाकाडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रीक्त पदावर दीपाली कोतवाल यांची नियुक्ती झाली आहे. त्या मूळच्या जळगाव येथील रहिवासी आहे. गोर-गरीब जनतेची विनाविलंबपणे कामे करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !