मुक्ताईनगरच्या मुख्याधिकार्‍यांनी घडवले मानवतेचे दर्शन : मयत रुग्णावर केले अंत्यसंस्कार


मुक्ताईनगर : शासकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा फारसा चांगला अनुभव नसल्याचे सर्वश्रृत असतानाच मुक्ताईनगरच्या मुख्याधिकारी मात्र त्यास अपवाद ठरल्या. शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यूनंतर अंत्यसंस्कार स्वच्छता कर्मचार्‍यांमध्ये धाकधूक असताना अश्विनी गायकवाड यांनी मात्र स्वतः पीपीई कीट परीधान करीत अंत्यसंस्काराची जवाबदारी स्वीकारत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत मयतावर मंगळवारी रात्री 11.30 वाजता अंत्यसंस्कार केले.

कर्मचार्‍यांचा वाढवला उत्साह
शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्णाच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी सफाई कर्मचारी धाकधूक करीत असतानाच मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांना याची माहिती मिळताच त्यांनी रात्री नगर पंचायतीचे कर निरीक्षक अच्युत निळ यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देत आपल्या इतर नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांना तत्काळ बोलावून घेतले. कर निरीक्षक अच्युत निळ, सचिन काठोके, सुनील चौघरी, रत्नदीप कोचुरे, गणेश कोळी, गोपाल लोहेरे, राहुल पाटील या कर्मचार्‍यांसह मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड पीपीई कीट परीधान करीत कोविड रुग्णालयात पोहोचले. मुख्याधिकार्‍यांनी मयताच्या अंत्यसंस्कारासाठी लागणार्‍या सर्व साहित्याची जमवाजमव केल्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी व त्यांचे पथक तसेच मयताचा मुलगा व मुलगी हे स्मशानभूमीत पोहोचून मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिला असतानाही कोणतीही भीती न बाळगता रात्री साडेअकरा वाजेपासून एक वाजेपर्यंत स्मशानभूमीत त्यांनी थांबून कर्मचार्‍यांचा उत्साह वाढवत मानवतेचे दर्शन घडवले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !