रावेर पोलिसांचे पालमध्ये छापे : अवैध दारू केली जप्त
रावेर : रावेर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध दारू अड्यावर धाड टाकून तिघांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपी प्रदीप राठोड, राजू जाधव, पूनमसिंग बारेला (तीन्ही रा.पाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तिघाही संशयीतांकडून पाल गावात वेगेगळ्या ठिकाणी गावठी हात भट्टीची दारू बनवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यामार्गदर्शनाखाली छापा टाकून चार हजार रुपये किमतीची 60 लिटर दारू नष्ट करण्यात आली. कारवाई पोलिस कर्मचारी राजेंद्र राठोर, नरेंद्र बाविस्कर, अतुल तडवी यांनी केली आहे.

