साठेबाजीमुळे युरीयाची टंचाई : माजी मंत्री एकनाथराव खडसे
रावेर : युरीया खतांची कुठेही टंचाई नसून साठेबाजांनी निर्माण केलेली कृत्रिम टंचाई आहे. यूरीया सर्व शेतकर्यांना मिळायला हवा जर मिळत नसेल तर मी कृषीमंत्री दादासाहेब भूसे यांच्याशी बोलणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. जळगाव जिल्हात या आधी यूरीयासाठी चाळीसगावला लाठीचार्ज करावा लागला होता तर शिरपुर येथे गोळीबार करावा लागला होता. माझ सरकार आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मी कृषीमंत्री असतांना यूरीयाचा 266 रुपये दर निश्चित केला व तेव्हा पासुन आज सुध्दा तोच भाव कायम आहे. आज सुध्दा युरीया रासायनिक खतांची कुठेच टंचाई नसुन साठेबाजांनी निर्माण केलेली कृत्रिम टंचाई आहे. आताचे सरकार या साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी अकार्यक्षम असून लोकप्रतिनिधी सुध्दा शेतकरर्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नसल्याने सर्वसाधारण शेतकर्यांचे हाल होत असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

