नशिराबादमध्ये लोखंडी पोल चोरी : आरोपी जाळ्यात


भुसावळ : वर्षभरापूर्वी नशिराबाद येथून 25 हजार रुपये किंमतीचे लोखंडी अँगल चोरीला गेल्याने नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी संशयीत आरोपी विशाल प्रेमचंद तायडे (30, रा.भुसावळ) यास अटक करण्यात आली. 23 मार्च 2018 रोजी तक्रारदार पवन सुधाकर वाघुळदे यांच्या मालकिचे 25 हजार रुपये किंमतीचे लोखंडी पोल आरोपीने लांबवले होते. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव, प्रवीण ढाके आदींच्या पथकाने आरोपीला भुसावळच्या गोलाणी परीसरातून रविवारी अटक केली.


कॉपी करू नका.