जळगावातील हद्दपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे हद्दपार केल्यानंतरही शहरात फिरत असलेल्या दोघा आरोपींच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. सल्या उर्फ सलीमखान कादीरखान पटवे (32, रा.गेंदालाल मिल, बिल्डिंग क्रमांक 12, रूम नंबर 2 , जळगाव) व विशाल भाऊसाहेब मोरे (25, रा.गेंदालाल मिल, बिल्डिंग नं. 09, रूम क्रमांक 29, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक महाजन, सुनील दामोदरे, विजय शामराव पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, नंदलाल पाटील आदींनी सल्ल्याचे गेंदालाल मिल भागातून पकडले. आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.तर विशाल मोरेच्या अशोक महाजन, सुनील दामोदरे, विजय शामराव पाटील,सचिन महाजन,भगवान पाटील, नंदलाल पाटील आदींनी मुसक्या आवळल्या. आरोपीविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.