अट्टल घरफोड्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : अट्टल घरफोड्याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. रीजवान शेख गयासोद्दीन (रा.तांबापुरा जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला असून आरोपीस जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीच्या अटकेतील आणखी काही घरफोड्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

घरफोडीतील मोबाईल जप्त
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वात अनिल इंगळे, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, दादाभाऊ पाटील, महेश पाटील, विजय शामराव पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, नंदलाल यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, सैय्यद समीर सैय्यद कबीर यांच्या घरातून आरोपी रीजवान शेख गयासोद्दीन (तांबापुराए जळगाव) याने मोबाईल चोरून तो जसमतसिंग आयसिंग टाक उर्फ जस्सु (25, रा.शामा फायर समोर, तांबापुरा, जळगाव) याच्याकडे गहाण ठेवल्याची बाबही समोर आल्याने जस्सू यासही ताब्यात घेण्यात आले होते. आरोपी रीजवान यास घरफोडीच्या गुन्ह्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.