भुसावळ बाजारपेठच्या नूतन पोलिस निरीक्षकांचा सत्कार
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात नव्यानेच रूजू झालेल्या पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांचा सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी रविवारी सायंकाळी भेट घेवून सत्कार केला. याप्रसंगी धांडे यांनी नूतन निरीक्षकांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भागवत यांनी आगामी नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहनही केले. याप्रसंगी पवन नाले, यतीन पाटील, मयूर लोखंडे, चेतन लोखंडे आदींची उपस्थिती होती.