भुसावळात विद्युत खांबाला चिपकल्याने वृद्धाचा मृत्यू


भुसावळ- शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसामुळे विद्युत खांबात वीज प्रवाह उतरल्याने शहरातील गंगाराम प्लॉट भागातील वृद्धाचा मृत्यू ओढवला. अमृत बाबुलाल वर्मा (60, गंगाराम प्लॉट, कोलते चेंबरजवळ, भुसावळ) असे मयत वृद्धाचे नाव आहे. सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वर्मा यांच्या घराबाहेर इलेक्ट्रीक पोल असून त्याला स्पर्श होताच जागीच चिपकल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंब बाहेरगावी गेल्यानंतर दुर्घटना
नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानंतर वर्मा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य खंडवा येथे गेले असतानाच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत वर्मा हे बॉम्बे रेग्झिनचे संचालक राजेंद्र वर्मा यांचे बंधू होत.


कॉपी करू नका.