हातेडच्या सेंट्रल बँकेतील शिपायाचा अपघाती मृत्यू


जळगाव- दुचाकीवरुन जळगावकडे घराकडे जाताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत किशोर शिवाजी ठाकूर (34, रा.कोळीपेठ) या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ममुराबादजवळ हा अपघात झाला. ठाकूर हे चोपडा तालुक्यातील हाथेड येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत शिपाई म्हणून नोकरीस होते. दोन दिवसांची सुटी असल्याने घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. शहरातील राममंदिर परिसरातील कोळीपेठ येथे किशोर ठाकूर यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. 1 सप्टेेंबर रोजी रविवारी सुटी असल्याने शनिवारी सायंकाळी ड्युटी आटोपून त्यांच्या दुचाकीने (एम.एच.19 सी.एस 8962) जळगावकडे निघाले असताना हा अपघात झाला.


कॉपी करू नका.