राजपूत समाजाच्या ऐक्यासाठी गुणगौरव सोहळा गरजेचा


गटविकास अधिकारी विलास भाटकर : भुसावळात राजपूत समाजातील गुणवंतांचा गौरव

भुसावळ : भुसावळ विभागातील राजपूत समाज्याच्या ऐक्यासाठी गुणगौरव सोहळ्यासारखे कार्यक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज असून त्यामुळे समाजाच्या ऐक्यासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न हा प्रेरणादायी असून यासारखे उपक्रम समाजाने राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भुसावळचे गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी राजपूत समाज संघर्ष समितीतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या केले. वांजोळा रोडवरील स्टार रीसॉर्ट येथे झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खडक्याचे उद्योजक सुरसिंग पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून योगेंद्र पाटील, पत्रकार संजयसिंग चव्हाण, विक्रांतसिंग महाजन, मनोरंजनसिंग राजपूत यांची उपस्थिती होती. प्रसंगी मान्यवरांच्या समाजातील गुणवंतांना गौरवण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम
प्रास्ताविक भगतसिंग पाटील तर सूत्रसंचालन डी.एन.पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन बी.एन.पाटील यांनी मानले. यावेळी राजपूत संघर्ष समितीचे संयोजक प्रवीणसिंग पाटील, आयोजन समितीचे बी.एन.पाटील, अशोक पाटील, कृष्णा पाटील, यशवंत चौधरी, दीपक राजपूत, सुनील चौधरी, हर्षल पाटील, सुपडूसिंग महाजन, दिवाणसिंग राजपूत, चंदू बोरसे, पवन पाटील, चंदू चव्हाण, सोनी ठाकूर, अमोल पाटील, सुरेंद्र पाटील, प्रमोद चौधरी, संदीप भोळे, गोपीसिंग राजपूत, भीमसिंग पाटील, रवींद्र पाटील, युवराजसिंग पाटील, दिनेश चौधरी, भाग्येश चौधरी, आशुतोष चौधरी, तुषार पाटील व इतर समाजबांधव महिला भगिनी व व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.