कोल्हाडीत चोरट्यांचा उच्छाद : दिवसा दोघा भावांची घरे फोडली
बोदवड : तालुक्यातील कोल्हाडी येथे भरदिवसा दोन बंद घरांमधून चोरट्यांनी 39 हजारांची रोकड लांबवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नामदेव पुरूषोत्तम लढे (कोल्हाडी) यांच्या फिर्यादीनुसार 3 रोजी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधत दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील 37 हजारांची रोकड लांबवली तर लढे यांच्या शेजारी राहणार्या मनोहर पुरूषोत्तम लढे यांच्या घराचेही कुलूप तोडून लोखंडी पेटीतून दोन हजारांची रोकड लांबवली. तपास उपनिरीक्षक मालचे करीत आहेत. या घटनेने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.