जळगाव घरकुल घोटाळा : 38 आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी
10 संशयीत आरोपींवर रुग्णालयात उपचार ; 12 संशयीतांचा जामिनासाठी अर्ज
जळगाव : घरकुल घोटाळ्याप्रकरणी 48 पैकी 38 आरोपींची मंगळवारी दुपारी एक वाजता धुळे कारागृहातून नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली तर 10 संशयीतांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना धुळ्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, 12 आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला. घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे विशेष न्यायालयाने शनिवारी 48 आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली होती.
बंदोबस्तात आरोपी नाशिक कारागृहात
जळगावातील राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी मंगळवारी दुपारी 38 संशयीत आरोपींना धुळे कारागृहातून नाशिक कारागृहात प्रचंड बंदोबस्तात हलवण्यात आले तर 10 संशयीत आरोपींची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर धुळ्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवचरण ढंढोरे, दत्तू कोळी, सदाशीव ढेकळे, विजय कोल्हे, अलका लढ्ढा, सुधा काळे, साधना कोगटा व अन्य दोनांवर उपचार सुरू आहेत.