भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात श्री गणरायाचे पर्यावरण पद्धत्तीने विसर्जन
भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयात बुधवारी श्री गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. उत्सवामधून पर्यावरणाला होणारा धोका पाहता व विद्यार्थ्यांवर पर्यावरण विषयक संस्कार घडवण्याच्या उद्दीष्टाने विद्यालयातील हरी सेनेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक श्री विसर्जनाचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी हरीत सेनाप्रमुख डी.एम.हेलोडे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज असल्याचे सांगत परीसरातील मंडळांना सुद्धा पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.किरंगे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पर्यवेक्षक एस.एल.राणे, ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक, ए.एम.जटाळे, एस.एस.कापसे, एस.एस.पाटील, एस.पी.महाजन यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.