मनमाड रेल्वे स्थानकावर तरुण बेपत्ता


मनमाड : डाउन तपोवन एक्सप्रेसने कल्याण ते जालना प्रवास करीत असलेला पिराजी सेटीबा जाताने (20, रा.निपानी टाकळी, ता.जि.परभणी) हा तरुण 4 मार्च 2019 रोजी बेपत्ता झाला आहे. हा तरुण मंद बुद्धीचा असल्याने त्याला उपचारासाठी सैलानी बुलढाणा येथे घेवून जात असताना तो गाडी मनमाड रेल्वे स्थानकावर उभी असताना आईस धक्का मारून पळाला. सर्वदूर शोधूनही तो न सापडल्याने मनमाड लोहमार्ग पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. हा तरुण कुणाला आढळल्यास मनमाड लोहमार्गचे दिलीप महाजन यांच्याशी 02591-222201 वा 9823189747 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.