बोदवडमध्ये ‘फुगे घ्या फुगे’ गाण्यावर डोलले महाविद्यालय
अण्णा सुरवाडेसोंबत विद्यार्थ्यांनी धरला ताल ः बोदवड महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन
बोदवड : ‘व मनी माय, बबल्या इकस केसांवर फुगे’ या खान्देशी गाण्याने खान्देशी तरुणाईला भुरळ घातल्यानंतर अल्पवधीतच या गाण्याचे गायक व अल्बममधील कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आले. या गाण्याचे गायक असलेले अण्णा सुरवाडे बोदवड महाविद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘व मनी माय, बबल्या इकस केसांवर फुगे’ हे लोकप्रिय गीत सादर करताच संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्यासोबत डोलले तर अनेकांना त्यांच्या गायनाचा व्हिडिओदेखील मोबाईलमध्ये कैद केला.
बोदवड महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन
बोदवड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी प्रसिद्ध गायक, गीत लेखक अण्णा सुरवाडे यांच्या हस्तेझाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डी.एस.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अनिल बारी, प्रा.अजय पाटील, प्रा.कांचन दमाडे, डॉ.वंदना बडगुजर उपस्थित होत्या. प्रसंगी प्राचार्य चौधरी यांनी सुरवाडे यांच्या गायन क्षेत्रातील खडतर प्रवासाचा व त्यांच्या महाविद्यालयातील कलागुणांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. महाविद्यायांच्या वतीने सुरवाडे यांचा सत्कार करण्यातआला. या कार्यक्रमासाठी डॉ.अनिल बारी, प्रा.अजय पाटील, प्रा.कांचन दमाडे, डॉ.वंदना बडगुजर यांनी परीश्रम घेतले.