मिरवणुकीला फाटा देत भुसावळात रनिंग स्टाफ गणेशोत्सव मंडळातर्फे श्री विसर्जन


लोकोपायलट स्व.पंकज तांबोळी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अन्नदानाचा कार्यक्रम

भुसावळ : भुसावळ रेल्वे रनिंग स्टाफ गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा श्री विसर्जन मिरवणुकीला फाटा देत शुक्रवारी ‘श्री’ विसर्जन करण्यात आले. रेल्वेतील लोकोपायलट व प्रेमळ व विश्‍वासु सहकारी असलेल्या स्व.पंकज गुलाब तांबोळी यांच्या अकाली झालेल्या निधनानिमित्त हा निर्णय घेण्यात आला. सालाबादाप्रमाणे 2 रोजी श्रींची स्थापना करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी श्रींची आरती केल्यानंतर वाजंत्रीला फाटा देत तापी नदी तिरावर श्रींचे विसर्जन करण्यात आले.

स्व.पंकज तांबोळींना वाहिली श्रद्धांजली
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात लोकोपायलट असलेल्या स्व.पंकज तांबोळी यांनी अल्पशा कालावधीत आपल्या मधूर वाणीने मोठा मित्र परीवार जमवला होता. अमरनाथ यात्रेप्रसंगी त्यांचा रक्तदाब वाढल्यानंतर ब्रेनहॅमरेजने झालेला अकाली मृत्यू सर्व लोकोपायलटांना चटका लावून गेला त्यामुळे सर्व मित्रांनी यंदाच्या गणेशोत्सवात विविध कार्यक्रम तसेच श्री विसर्जन मिरवणूक टाळून उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. 5 रोजी स्व.तांबोळी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. शुक्रवारी श्री विसर्जन मिरवणुकीतील वाहनावर स्व.पंकज तांबोळी यांचा श्रद्धांजलीपर फलक लावूनही त्यांच्या स्मृतीस सर्वांनी अभिवादन केले. याप्रसंगी सर्वांनाच गहिवरून आले.

उत्सव यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
उत्सव यशस्वीतेसाठी ए.टी.खंबायत, डी.बी.महाजन, आर.वाय.भोळे, के.पी.चौधरी, एन.बी.बारी, जी.आर.वराडे, एम.पी.चौधरी, ए.डी.पाटील, ए.के.मालविया, जी.ए.पाटील, पी.आर.पाटील, के.पी.हिरे, जी.एन.हिराळकर, एन.डी.सरोदे, गोकुळ महाजन, एल.व्ही.लोहार, एस.पी.देशमुख, एल.आर.पाटील, एस.एस.पाटील, के.डी.महाजन, जे.एस.सोनवणे यांच्यासह लोकोपायलटांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.