जळगाव कारागृहात पुन्हा दुसर्यांदा कैद्यावर हल्ला

अधीक्षकांवर हल्ला करणार्या आरोपीची वाढली हिंमत : रुग्णालयात जाण्यावरून वाढला वाद
जळगाव- जळगाव कारागृहाचे तुरुंगाधिकारी किरण संतोष पवार यांच्यावर भांडण करणार्या दोघा कैद्यांमधील सचिन दशरथ सैंदाणे (30) या कैद्याने लोखंडी पट्टीने वार केल्याची घटना मंगळवारी घडली होती. ही घटना विस्मरणात जात नाही तोच पुन्हा याच कैद्याने दुसर्या एका कैद्यावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडल्याने जळगावातील कैद्यांमध्ये प्रचंड भीती व उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या अनुषंगाने कैद्यांसोबतच्या नातेवाईकांच्या मुलाखती शुक्रवारी होवू दिल्या नाहीत.
कैद्यावर ब्लेडने केले वार
शुक्रवारी पहाटे 6.30 सुमारास कारागृहात शुभम देशमुख हा कैदी ब्रश करत असताना रुग्णालयात दाखल करण्याच्या कारणावरून शुभम व सचिन सैंदाणे या कैद्यांमध्ये वाद होवून सचिनने शुभमच्या पाठीवर चार ठिकाणी लोखंडी पत्र्याने वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारागृह अधीक्षकांनी माहिती जाणून घेतली. मारहाणीनंतर शुभमला दुसर्या वॉर्डात हलविण्यात आले होते.
शुक्रवारी नातेवाईकांच्या मुलाखती बंद
शुक्रवारी घटनेनंतर कारागृह अधीक्षक यांनी कर्मचार्यांची झाडाझडती घेतल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर नियमितप्रमाणे सकाळच्या सत्रात होणार्या नातेवाईकांच्या मुलाखती होवू देण्यात आल्या नाहीत. दुपारी तीन वाजेच्या सुमारास कैद्यांसोबत नातेवाईकांच्या मुलाखती सुरू झाल्याचे सांगण्यात आले.




