रावेर विधानसभेसाठी इच्छूक अनेक मात्र निष्ठावंतांना मिळणार तिकीट


नामदार हरीभाऊ जावळे ; रमजीपूरला भाजपाचा मेळावा

रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अनेक इच्छूक उमेदवार भाजपाकडे खूप आहेत मात्र पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा पक्ष संघटन आधी विचार करते त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांच भाजपात उमेदवारीसाठी विचार होतो, असे मत कृषी संशोधन परीषेचे उपाध्यक्ष नामदार हरीभाऊ जावळे यांनी व्यक्त करीत भाजपामधील काही इच्छूकांना चिमटाही काढला. रावेर तालुक्यात रमजीपूर येथे पाल-केर्‍हाळा भाजपा गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

सोशल मिडीयातून जनतेची दिशाभूल
आमदार जावळे म्हणाले की, रावेर-यावल मतदारसंघात काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कामे दाखवून जनतेची दिशाभूल करीत आहे, यास कुणीही बळी पडू नये. देश्यात व राज्यात स्थिर सरकार देण्याचे काम जनतेने केले आहे. अद्याप काही विकासाची कामे अपूर्ण असून ही कामे पूर्ण करण्यासाठी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी करीत आतापर्यंत केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला.


कॉपी करू नका.