भुसावळातील तापी पात्रात एकाची आत्महत्या


भुसावळ :  तापी नदीच्या पात्रात जुगा देवी परीसरात साहेबराव नथ्थू धांडे (वय 58) यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास आढळल्याने शहर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धांडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. तापी नदीच्या पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची अरुण रंधे यांनी दिल्यावरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृ्त्यूची नोद करण्यात आली. हवालदार अनिल चौधरी पुढील तपास करीत आहे. धांडे यांनी आत्महत्या केली की अन्य कुठल्या कारणांवरून त्यांचा मृत्यू झाला ? याबाबत माहिती पोलिस तपासात निष्पन्न होणार आहे.


कॉपी करू नका.