….तर तुमचा फोटोदेखील पंतप्रधानांच्या ट्वीटर अकाऊंटवरून रीट्वीट
नवी दिल्ली : ‘चंद्रयान-2’ मोहीमेचा महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी मध्यरात्री पार पडत असून संपूर्ण देशाच्या नजरा आता याकडे वळल्या आहेत. रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रम हे उपकरण उतरणार असून ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडल्यास भारत हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश ठरणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन करीत स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले असून काही निवडक फोटो आपण रीट्विट करणार असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा खास सोहळा पाहण्यासाठी इस्रोमध्ये जाणार आहेत.