चंद्राच्या दक्षिण धु्रवावर उतरणार ‘चांद्रयान’

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रो सेंटरमध्ये दाखल : तीन लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास
बंगळुरु : चांद्रयान शनिवारी मध्यरात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाणार असून हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी 60 विद्यार्थ्यांसोबत बंगळुरुमधील इस्त्रोच्या सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. सुमारे तीन लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर उतरण्यासाठी चांद्रयान 2 ला जवळपास 55 दिवस लागले असून चांद्रयान चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरणार आहे. यानंतर वैज्ञानिकांना चंद्राच्या अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे.
भारताची दुसरी चंद्रमोहिम
चांद्रयान-2 चं 22 जुलै रोजी अवकाशात झेपावले होते तर चांद्रयान पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम असून यापूर्वी 2008 मध्ये चांद्रयान एकचे भारताने प्रक्षेपण केलं होतं.




