चंद्रावर उतरणार्‍या विक्रम लॅण्डरचा अखेरच्या क्षणी संपर्क तुटला


बंगळुरु : चांद्रयान शनिवारी मध्यरात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जात असताना अखेरच्या क्षणी इस्त्रोला पहाटे एका अपयशाचा सामना करावा लगाला. चंद्रावर अलगद उतरणार्‍या विक्रम लँडरचा संपर्क शेवटच्या काही सेकंदात तुटला. ‘विक्रम’ लँडरच्या वाटचालीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले होते. हा क्षण अनुभवण्यासाठी इस्त्रोच्या बंगळूरु इथल्या नियंत्रण कक्षात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातीने उपस्थित राहिले होते.

अन् अखेरच्या क्षणी संपर्क तुटला
चंद्राच्या पृष्ठभापासून 35 किलोमीटर उंचीवर असतांना रात्री एक वाजून 37 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर स्वयंचलित पद्धतीने उतरायला सुरुवात केली. उतरण्याच्या सुरुवातीला एक हजार 640 मीटर प्रति सेकंद असा विक्रम लँडरचा वेग होता. टप्प्याटप्प्याने हा वेग कमी करत विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना शेवटच्या क्षणी संपर्क तुटला.

भारताची दुसरी चंद्रमोहिम
चांद्रयान-2 चं 22 जुलै रोजी अवकाशात झेपावले होते तर चांद्रयान पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम असून यापूर्वी 2008 मध्ये चांद्रयान एकचे भारताने प्रक्षेपण केलं होतं.

पंतप्रधान म्हणाले देश तुमच्या सोबत
चांद्रयानाशी संपर्क तुटल्यानंतर पंतप्रधानांनी इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधत देश तुमच्या सोबत असल्याचे सांगत जीवनात तर चढाव येत-जात असल्याचे सांगत त्यांची हिंमत वाढवली. ही छोटी उपलब्धी नक्कीच नाही, असे सांगून त्यांनी पुन्हा उत्साह वाढवला. देशातील वैज्ञानिकावर देशवासीयांना अभिमान असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांची संवादही साधला.


कॉपी करू नका.