तीन उपनिरीक्षक मुख्यालयात तर सहा.निरीक्षकासह उपनिरीक्षकास यावलसह भुसावळात पोस्टींग


तीन वर्ष एकाच उपविभागात/विधानसभा क्षेत्रात सेवा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बदल्या

भुसावळ : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तीन वर्ष एकाच उपविभागात/विधानसभा क्षेत्रात सेवा बजावलेल्या चार उपनिरीक्षकांसह एका सहाय्यक निरीक्षकांची पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी शनिवारी बदली केली आहे. संबंधित अधिकार्‍यांना निवडणुकीशी संबंधीत कुठलीही जवाबदारी न देता तातडीने कार्यमुक्त करावे, असे आदेशात बजावण्यात आले आहेत.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
मुक्ताईनगरचे उपनिरीक्षक कैलास रामदास भारसके, फैजपूरचे उपनिरीक्षक जिजाबराव पंढरी पाटील व वरणगावचे उपनिरीक्षक कैलास गंगाराम आकुले यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. यावलच्या उपनिरीक्षक सुनीता मारोती कोळपकर यांची भुसावळ बाजारपेठ तर भुसावळ बाजारपेठच्या सहाय्यक निरीक्षक सारीका वसंत खैरनार यांची यावल पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.


कॉपी करू नका.