साकेगाव ग्रामपंचायतीची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस करणार


आमदार संजय सावकारे ; मंगल कार्यालयाचे भूमिपूजन

भुसावळ- तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यातील एकमेव पायलट ग्रामपंचायत असून उत्कृष्ट सेवा व विविध शासकीय योजना काटेकोरपणे राबविणारी साकेगावची ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी साकेगाव ग्रामपंचायतीच्यामंगल कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी केले.

यांची होती उपस्थिती
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भाऊ भोळे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास भाटकर, विस्तार अधिकारी उमेश पाटणकर, कृउबाचे माजी सभापती संजय पाटील, माजी सरपंच आनंद ठाकरे, सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, दिगंबर पाटील, संतोष भोळे, अनिल सोनवाल, गजानन कोळी, बळीराम सोनवणे, ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे, शिवसेना तालुका उपप्रमुख हिरामण पाटील, भारतीय जनता पार्टीचे मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

वर्षभरात दिला 70 लाखांचा निधी -आमदार
आमदार म्हणाले की, गेल्या वर्षात तब्बल 70 लक्ष रुपयांचा निधी गावासाठी दिला आहे. विकसनशील ग्रामपंचायत असल्यामुळेच विशेष लक्ष देत असल्याचे ते म्हणाले. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनेदेखील साकेगावचा आदर्श घ्यावा, असे त्यांनी सांगत ग्रामपंचायतीची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस असल्याची घोषणा त्यांनी केली. भूमिपूजन सोहळ्यानंतर आमदार ांच्या हस्ते गावात प्रमुख रस्त्यांवर तसेच मंगल कार्यालयाच्या जागेत 100 झाडे लावण्यात आली. यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचारी वृंदांसह सरपंच कमिटीने परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.