भुसावळात स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचा शुभारंभ


62 लाखांच्या निधीतून होणार विविध विकासकामे

भुसावळ : शहरातील तापी नदीकाठावरील स्मशानभूमीत विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. आमदारांच्या मागणीची दखल घेत नुकताच 62 लाख 27 हजारांचा निधी मंजूर झाल्यानंतर शनिवारी आमदार संजय सावकारे व लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचा कुदळ मारून व फलकाचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला.

स्मशानभूमीचा होणार कायापालट
आप्तांच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत येणार्‍या नागरीकांना बसण्यासाठी बाक तसेच ओट्यांची व्यवस्था, हॉल तसेच मृतदेहावर अंतिम दाह करण्यासाठीचे ओटे, स्मशानभूमीच्या अंतर्गत आवारात काँक्रिट रस्ता व पेव्हिंग ब्लॉक, उद्यान तसेच संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार्‍या या कामासाठी 62 लाख 27 हजार रुपये निधी मंजूर आहे. गेल्या काही वर्षांपासून स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरीकांमधून नाराजीचा सूर होता मात्र आता स्मशानभूमीचा कायापालट होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कार्यक्रमप्रसंगी यांची होती उपस्थिती
आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटसीस प्रा.सुनील नेवे, पालिकेतील भाजपाचे गटनेता हाजी मुन्ना तेली, नगरसेवक युवराज लोणारी, मनोज बियाणी, प्रमोद नेमाडे, निर्मल (पिंटू) कोठारी, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, अमोल इंगळे, राजेंद्र नाटकर, वसंत पाटील, निकी बत्रा, मुकेश गुंजाळ, देवा वाणी, दिनेश नेमाडे, शेख शफी पहेलवान, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, बापू महाजन, किशोर पाटील, सोनी संतोष बारसे, अजय नागराणी, रवी निमाणी,सुनील राखुंडे, महेंद्र अग्रवाल, योगेश पाटील, विनय बढे, अ‍ॅड.निर्मल दायमा, रायसिंग पंडित, गिरीश महाजन, रमाशंकर दुबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस.यु.कुरेशी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित होते.


कॉपी करू नका.