सतीश पाटलांचे विधान ‘ते’ विधान बालिशपणाचे

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा टिकेनंतर पाटलांना टोला
नाशिक : राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी केलेलं वशीकरणाचं विधान निश्चितच बालिशपणाचे असून आता त्यांनी आपल्या वडिलांचे नाव न लावण्याची तयारी करावी, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे सतीश पाटलांना लगावला. सतीश पाटील यांनी महाजनांनी मुख्यमंत्र्यांवर वशीकरण मंत्राचा वापर करून त्यांना वश केल्याची टीका शुक्रवारी जळगावात पाटील यांनी केली होती. त्या टिकेला जलसंपदा मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. 19 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा होत असून या सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना त्यांना पाटील यांच्या विधानाबाबत छेडल्यानंतर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.




