हिंगोण्यातील तरुणाचा मृत्यू ; पिता-पुत्राविरुद्ध अखेर खुनाचा गुन्हा


फैजपूर : यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ कारणावरून एका 28 वर्षीय तरुणाला मारहाण झाल्याने त्याचा 7 रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयताच्या आईने तक्रार दिल्यावरून सुभाष देवीदास पाटील व सोनल सुभाष पाटील दोघ (हिंगोणा) या पिता-पूत्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले.

मारहाणीत झाला मृत्यू
हिंगोणा येथे 7 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नितीन बाविस्कर या तरुणाने संशयित आरोपींच्या घरासमोर केरकचरा व जेवणाची उष्टी ताटली तसेच दारू खोक्याचा पुठ्ठा टाकला व तो टाकला? असा जाब विचारत सुभाष पाटील व सोनल पाटील या पिता-पुत्रांनी नितीन यास शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर मारून दुखापत केली होती. या हल्ल्यात नितीन गंभीर जखमी झाल्याने जळगाव सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने मयताची आई गीताबाई पांडुरंग बाविस्कर यांनी फैजपूर पोलिसात रविवारी तक्रार दिल्यावरून सुभाष पाटील व सोनल पाटील या पिता-पूत्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व सहकारी करीत आहेत.


कॉपी करू नका.