भुसावळात उद्या राष्ट्रवादीचे आंदोलन
माजी मंत्री खडसेंवर बेछूट आरोप करणार्या प्रफुल लोढा यांच्या प्रतिमेचे होणार दहन
भुसावळ : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर जामनेर येथील प्रफुल लोढा यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत बेछूट आरोप केले होते. लोढा यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी निषेध केला असून जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिराजवळ रविवारी सकाळी 10 वाजता प्रतिमा दहन व जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी, शहराध्यक्ष नितीन धांडे, तालुकाध्यक्ष भरत मराठे यांनी केले आहे.

