फैजपूरातील ऐतिहासीक वारसा असलेली शाळा टिकायला हवी


महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज : फैजपूरात गुणवंतांचा गौरव

फैजपूर- म्युनीसीपल हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार तसेच शालेय गणवेश वाटप कार्यक्रम शिक्षकदिनी म्युनीसीपल हायस्कूलमध्ये झाला. अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन महाराज होते.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, शिक्षण समिती सभापती शकुंतला भारंबे, शालेय समिती अध्यक्ष शेख कुर्बान, नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलीम खां मण्यार, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, नगरसेविका अमिता चौधरी, नगरसेविका वत्सला कुंभार, सामाजिक कार्यकर्ते मलक आबीद आदी उपस्थित होते. महामंडलेश्वर जनार्दन महाराज, नगराध्यक्षा महानंदा होले यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय गणवेश वाटप तसेच श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेकडून गरजु व निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

ऐतिहासीक वारसा असलेली शाळा टिकायला हवी
जनार्दन महाराज म्हणाले की, शाळेतील शिक्षकांनी अनेक यशस्वी व्यक्तींना घडविले आहे त्यामुळे ऐतिहासीक वारसा असलेली ही शाळा टिकली व झाली पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवे. इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी प्रतीक्षा योगेश नेवे हिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे सांस्कृतिक प्रमुख बी.डी.महाले यांनी ‘भगवान बुद्ध व त्यांचा धम्म’ हा ग्रंथ जनार्दन महाराज यांना भेट दिलाफ या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक आर.एल.आगळे व पर्यवेक्षक एस.ओ.सराफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक एस.के.महाजन यांनी तर सूत्रसंचालन बी.डी.महाले तसेच आभार नीलिमा खडके यांनी मानले.


कॉपी करू नका.