आठ विशेष उत्सव गाड्यांचा वेळेत बदल
भुसावळ : आठ विशेष उत्सव गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
एलटीटी-गोरखपूर विशेष गाडी
डाऊन 02165 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी दर गुरुवारी व सोमवारदरम्यान 4 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान धावणार असून या गाडीला नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02166 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दर शुक्रवारी व मंगळवारदरम्यान 5 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे. या गाडीला भुसावळ, जळगाव, मनमाड व नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

एलटीटी-मंडुआडीह विशेष गाडी
डाऊन 02167 लोकमान्य टिळक टर्मिनस-मंडुआडीह विशेष गाडी 1 ते 31 जानेवारीदरम्यान नाशिक, भुसावळ व खंडवा रेल्वे स्थानकावर थांबेल. अप 02168 मंडुआडीह लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी 2 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान धावणार अ या गाडीला खंडवा, भुसावळ, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
अप नागपूर-मडगाव
अप 01235 नागपूर-मडगाव ही गाडी 8 ते 29 जानेवारीदरम्यान दर शुक्रवारी धावणार असून या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 01236 मडगाव-नागपूर ही गाडी 9 ते 30 जानेवारीदरम्यान धावणार असून या गाडीला नाशिक, भुसावळ, अकोला, बडनेरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
हुबळी-वाराणसी विशेष गाडी
डाऊन 07323 हुबळी ते वाराणसी ही गाडी 25 डिसेंबर ते 29 जानेवारीदरम्यान धावणार असून या गाडीला मनमाड, भुसावळ, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 07324 वाराणसी ते हुबळी ही गाडी दर रविवारी 27 डिसेंबर ते 31 जानेवारीदरम्यान धावणार असून या गाडीला खंडवा, भुसावळ व मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

