गुन्हेगारीकडे पुन्हा वळाल तर गाठ माझ्याशी !
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरेंचे शस्त्र बाळगणार्यांना तंबी
भुसावळ : गावठी कट्टा बाळगणार्या 17 संशयीतांची शनिवारी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी बारकाईने चौकशी करीत त्यांच्याकडील वाहन, संपर्क क्रमांक व सध्या संशयीत करीत असलेल्या कामकाजाबाबत माहिती नोंदवून घेतली तसेच पुन्हा गुन्हेगारीकडे वळले तर गाठ माझ्याशी असल्याची तंबीही दिली. शहरातील बाजारपेठ, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दितील पोलिसांच्या यादीवरील अवैधरीत्या पिस्तूल बाळगणार्यांची शनिवारी ओळख परेड डीवायएसपी कार्यालयात ठेवली होती. यावेळी दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या यादीवरील अवैधरित्या गावठी पिस्तूल बागळणार्यांची चौकशी करण्यात आली यावेळी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील
कर्मचारी उपस्थित होते.

